विक्रमगडमध्ये संपूर्णतः अभियानाला सुरुवात

विक्रमगडमध्ये संपूर्णतः अभियानाला सुरुवात

विक्रमगड (बातमीदार) : पंचायत समितीमध्ये संपूर्णतः अभियानाचा शुभारंभ पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, सभापती यशवंत कनोजा, सभापती संदीप पावडे, जिल्हा परिषद सदस्या सारिका निकम, गणेश कासट, मनोज बोरसे, लाडक्या लहांगे, तसेच पदाधिकारी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मांगु ना. गढरी यांच्या हस्ते पार पडले.

विक्रमगड हायस्कूलमधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत संपूर्णत: अभियानासाठी विक्रमगड परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच, नागरिकांमध्ये जागरुकतेसाठी घोषवाक्ये देण्यात आली. संदीप पावडे यांनी भारताचे व्हिजन २०४७ची संकल्पना काय आहे, हे सांगितले व त्याचे महत्त्व पटवून दिले. त्याचसोबत कुपोषणाचे प्रमाण हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. त्यावर आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मात करू, असे त्यांनी सांगितले.

भारत सरकारच्या निती आयोगाने तालुका कार्यक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य, कृषी, आयसीडीएस, एनआरएलए आदी विकास क्षेत्रातील ४० निर्देशांक उंचावण्यावर भर देण्यात आला आहे. त्यापैकी मृदा आरोग्यपत्रिका, महिला सबलीकरण, आरोग्य, पूरक पोषक आहार, शिक्षण आदी महत्त्वाच्या सहा निर्देशकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. सुवर्णा कामडी यांनी येणाऱ्या तीन महिन्यांत पालक मेळावा, संपूर्ण अभियान उत्सव आदी कार्यक्रमांची आखणी करून ठेवली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांनी निरंतर आरोग्य चाचणीचे महत्त्व पटवून दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com