पनवेल तालुक्यात जलमय स्थिती

पनवेल तालुक्यात जलमय स्थिती

Published on

पनवेल तालुक्यात जलमय स्थिती

भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचणी; तळोजा एमआयडीसीत पाणी

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : पनवेल तालुका आणि महापालिका हद्दीतील काही गावांना रविवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोरदार फटका बसला. या भागात पावसाचे प्रमाण जास्त नसले, तरी विकसकांकडून टाकण्यात आलेला भराव, महापालिकेच्या कंत्राटदारांनी अर्धवट केलेली नाले व गटारांची स्वच्छता आदींमुळे महापालिका हद्दीतील काही गावे, तळोजा एमआयडीसी व कळंबोली स्टील मार्केट पाण्याखाली गेले. पावसामुळे ज्या भागात नागरी वस्त्या बाधित झाल्या होत्या, अशा ठिकाणच्या रहिवाशांना महापालिकेने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.

कळंबोली येथील स्टील मार्केटमधील सर्व रस्ते रविवारी (ता. ७) पावसामुळे पाण्याखाली गेले. येथील स्टीलच्या अनेक गोदामांमध्ये पाणी साठले. तळोजा एमआयडीसीतून वाहणारी कासाडी नदी दुथडी भरून वाहत होती. या नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे वावंजे गावाजवळच्या उड्डाणपुलाहून नदीचा प्रवाह सुरू होता. काही नागरिक या प्रवाहात जीव धोक्यात टाकून नदीवरील पूल ओलांडत होते; परंतु त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी पोहचू शकले नाहीत. कळंबोली प्रभागामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी एकूण २७ ठिकाणी पंप कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामार्फत पाण्याचा निचरा करण्याचे महापालिकेचे प्रयत्न होते; परंतु पाण्याचा निचरा होईपर्यंत दुपार उजाडली. या ठिकाणी पनवेल पलिकेमार्फत ४५० कर्मचारी काम करीत आहेत. दरम्यान पडघे गावातील मुख्य प्रवाहाच्या नाल्यातील पावसाचा प्रवाह कमी झाला आहे. खारघर प्रभागामध्ये पाण्याचा निचरा होणेसाठी एकूण १४ पंप चालू असून त्यामार्फत पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. नावडे विभागात पाण्याचा निचरा होण्यासाठी एकूण ५ पंप चालू असून एका ठिकाणी जेसीबीमार्फत पाण्याचा निचरा करण्यात येत आहे. या वेळी पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पटेल मोहल्ल्यातील भारतनगर, कोळीवाडा विसर्जन घाट या ठिकाणी पाहणी केली.


..
पनवेलमध्ये नागरिकांचे स्थलांतर
पनवेल महापालिका हद्दीतील पटेल मोहल्ला येथील ७० पूरग्रस्तांना महापालिकेच्या उर्दू शाळेत स्थलांतरित करण्यात आले. पनवेल कोळीवाडा येथील ९० पूरग्रस्त नागरिकांना कोळीवाडा शाळेत स्थलांतरित करण्यात आले. या नागरिकांची महापालिकेतर्फे चहा पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील रोडपाली आदिवासी वाडीतील ६० घरे पाण्याखाली गेली असून २५० पूरग्रस्तांना रोडपाली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्थलांतरित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.