नवी मुंबई टुडे करीता

नवी मुंबई टुडे करीता

Published on

पाऊस कमी, तरीही तुंबले पनवेल
तळोजा एमआयडीसी, स्टील मार्केट, ग्रामीण भागाला फटका

पनवेल तालुका आणि महापालिकेच्या हद्दीत रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. कळंबोली, वावंजे, तळोजा एमआयडीसी, कळंबोली स्टील मार्केट, आदई, सुकापूर गाव, भिंगारी, करंजाडे आणि पनवेल कोळीवाडा परिसरातील रस्ते आणि घरांमध्ये पाणी गेले होते. शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत १२१ मिलिमीटर इतक्या पावसाची पनवेल परिसरात नोंद झाली. तुलनेने हा पाऊस पूरपरिस्थिती निर्माण होण्यासारखा नसला, तरी गावठाणांमध्ये झालेल्या अमर्याद भरावामुळे रहिवासी भागामध्ये पाणी गेल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे. कळंबोली, तळोजा एमआयडीसीमध्ये अनेक घरे आणि कंपन्यांमध्ये पाणी गेल्याने नाले व गटारे स्वच्छतेच्या नावाखाली महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
--------------
पनवेल प्रशासनाला धोक्याची घंटा
२६ जुलै २००६ ला पनवेलमध्ये आलेल्या महापुराच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीने पनवेलकरांना त्यांच्या आप्तेष्ट आणि मित्र परिवारातील सदस्यांना गमवावे लागले आहे. शेकडो लोकांचे संसार आणि व्यवसाय पाण्यात बुडून गेले. त्यावेळी पनवेलमध्ये ३५० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची विक्रमी नोंद झाली होती; परंतु रविवारी सकाळी केवळ १२१ मिलिमीटर झालेल्या पावसाचा जोर पनवेल महापालिकेने स्वच्छ केलेले गटारे, नाले सोसू शकले नाहीत. यातून तळोजा एमआयडीसीतील नदी आणि गटारांची एमआयडीसी व महापालिकेने केलेल्या कामांची पोलखोल झाली. अद्याप पावसाळ्याचे तीन महिने बाकी आहेत. अशा परिस्थितीत आजची अवस्था ही एमआयडीसी, महापालिका आणि रायगड जिल्हा प्रशासन या सरकारी यंत्रणांना धोक्याची घंटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.