भरधाव कारने दाम्पत्याला उडविले

भरधाव कारने दाम्पत्याला उडविले
Published on

अंधेरी, ता. ७ (बातमीदार)ः पुण्यातील पोर्शे कारच्या ‘हिट अँण्ड रन’च्या घटनेची मुंबईत पुनरावृत्ती झाली आहे. रविवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास ॲनी बेझंट रोडवर एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे.
गोरेगाव येथून मुंबईला येत असताना ॲनी बेझंट रोडवर हा अपघात झाला. यावेळी कारचालकाने जखमींना रुग्णालयात नेण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात एका महिलेचा जीव गेला आहे. मिहीर शहा (२४) हा रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करीत होता. त्यानंतर गोरेगाव येथील घरी मद्यप्राशन करूनही गाडी चालवीत आला. घरी गेल्यानंतर त्याने चालकाला आपल्याला लॉंग ड्राईव्हवर जाण्याचे सांगितले. कार घेऊन मिहीर हा पुन्हा गोरेगाव येथून मुंबईत आला. गोरेगावला जाताना मिहीर शहा स्वतः कार चालवत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. यावेळी एट्रिया मॉलजवळ भरधाव कारने प्रदीप नाखवा आणि त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांना फरपटत नेले. या अपघातात प्रदीप नाखवा बाजूला पडले. हा अपघात झाला तेव्हा कारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर होता, असा आरोप होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
------------------------------------------
मिहीरचा फोन बंद
मिहीर शहा याच्यासह त्याचा चालक होता, वरळीतील नेहरू तारांगण येथील बस स्टॉपच्या समोरच्या बाजूने जात असताना पहाटे हा अपघात झाला. मिहीरचा फोन सध्या बंद आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.
------------------------------------------
प्रदीप नाखवा यांचा आक्रोश
अपघाताचे वर्णन करत असताना नाखवा यांना अश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले, वरळीतील सीजे हाऊसपासून ते वरळी सी-लिंकपर्यंत त्या कारने माझ्या पत्नीला फरफटत नेले. तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दोन मुलांना टाकून माझी पत्नी आता गेली. आम्ही मासे विकून आमचा उदरनिर्वाह चालवतो. आता आम्ही जगायचे कसे? आज या पक्षाचे, त्या पक्षाचे लोक एकमेकांवर टीका करत आहेत; पण मागून हे आरोपींनाच पाठिंबा देतात. आम्हाला कोण वाचवणार? असा उद्विग्न प्रश्न प्रदीप नाखवा यांनी विचारला आहे.
--------------------------------------------
कारवाईची मागणी
या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका, पहिले पोलिस कारवाई करतील, त्यानंतर पक्ष कारवाई करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पुण्याप्रमाणे हा प्रकार घडला आहे, गुन्हा करणाऱ्याला कडक कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी राजू वाघमारे यांनी केली; तर शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण घटना सीसी टीव्हीत कैद आहे. राजकीय आरोप करणार नाही. चौकाचौकांत पोलिस उभे राहायला पाहिजे, रस्त्यावरून चालणाऱ्या माणसांच्या जीविताचे रक्षण झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.