टेम्पोच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

टेम्पोच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

Published on

टेम्पोच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू


सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. डोंबिवली पाईपलाईन मार्गावरील नेवाळी चौकात हा भीषण अपघात झाला. चंद्राबाई म्हात्रे असे मृत महिलेचे नाव असून ती मलंगगड परिसरातील खरड गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी आरोपी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.

मलंगगड भागातील नेवाळी चौक हा अत्यंत वर्दळीचा चौक आहे. रविवारी (ता. ७) सायंकाळी डोंबिवलीहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने चंद्राबाई यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात दाखल करण्याआधीच चंद्राबाई यांचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आरोपी टेम्पोचालक हा फोनवरून संभाषण करत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिललाईन पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.