सेवानिवृत्त शिक्षिकेला १२ वर्षांनी निवृत्तीवेतन

सेवानिवृत्त शिक्षिकेला १२ वर्षांनी निवृत्तीवेतन

Published on

कासा, ता. ८ (बातमीदार) : गेल्या १२ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षिकेला सेवानिवृत्ती वेतन व अन्य लाभ मिळाले आहेत.

कासा वेती येथील अपेक्षा माळी या प्राथमिक शिक्षिका म्हणून १२ वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या होत्या, पण त्यांना अद्यापपर्यंत सेवानिवृत्ती व अन्य लाभ मिळाले नव्हते. सेवानिवृत्ती व अन्य लाभ मिळावेत, म्हणून त्यांनी सरकारदरबारी खूप प्रयत्न केले. पण त्यांना लाभ मिळत नव्हते. शेवटी डहाणू व कासा सेवानिवृत्त कर्मचारी संघात त्यांनी आपली कैफियत मांडली. त्यामुळे महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन, पुणे यांच्याद्वारे शासन दरबारी समस्या मांडून, कोर्ट, कचेरी करून सेवानिवृत्तीनंतर बारा वर्षांनी अखेर त्यांना पेन्शन मंजूर करून दिली व तेवढ्या वर्षांचा लाभ मिळवून दिला गेला. यामुळे त्यांनी भारावून जाऊन आपले ऋण फेडण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी संघास देणगी रूपाने एक लाख रुपये दिले. कासा सेवानिवृत्त कर्मचारी संघाने आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही देणगी महाराष्ट्र पेन्शन असोसिएशनचे (पुणे) सरचिटणीस लक्ष्मण टेंबे यांच्याकडे सुपूर्द केली. या कार्यक्रमात डहाणू तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे, हेमंत धानमेर, कासा पोलिस ठाणे अधिकारी नामदेव बंडगर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.