पालिकेची यंत्रणा कुचकामी

पालिकेची यंत्रणा कुचकामी

Published on

पालिकेची यंत्रणा कुचकामी
प्रवाशांसह वाहनचालकांचे हाल
कांदिवली, ता. ८ (बातमीदार) ः मुसळधार पावसामुळे कांदिवली, बोरिवली आणि मालाड विभागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्‍यामुळे प्रवाशांसह वाहनचालकांचे अतोनात हाल झाले. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
गटारे आणि नालेसफाई योग्यरितीने न झाल्यामुळेच मुसळधार पावसात पाणी साचत असल्याचा ठपका नागरिकांनी पालिकेवर ठेवला. मालाड पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या सब-वेमध्ये, कांदिवली, पोईसर सब-वे, बोरिवली साईबाबा नगर, कांदिवली गावठाण पोईसर नदीलगतच्या तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्‍यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अनेक भागांमध्ये प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचते. पालिका पंपाची व्यवस्थादेखील करते. मात्र, तरीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा ठिकाणी पाणी साचणार नाही, यासाठी पालिकेने ठोस उपाययोजना करावी. लाखो रुपये खर्च करूनदेखील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिका अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवासी आणि वाहनचालक करत आहेत.

दुचाकी, रिक्षा बंद पडल्‍या
गुडघाभर पाणी साचल्याने दुचाकी, रिक्षा बंद पडल्या. वाहने ढकलत बाजूला काढताना वाहनचालकांची दमछाक झाली. दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात ठप्प झाले. बहुतांशी नागरिकांनी कामावर जाणे टाळले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.