आदित्य बिर्ला सन लाइफ क्वांट फंडला चोवीसशे कोटी मिळाले

आदित्य बिर्ला सन लाइफ क्वांट फंडला चोवीसशे कोटी मिळाले

Published on

आदित्य बिर्ला सन लाईफ क्वांट फंडला चोवीसशे कोटी रुपये

मुंबई, ता. ८ : आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीने नुकत्याच बाजारात आणलेल्या क्वांट फंडला दोन हजार ४१६ कोटी रुपये मिळाले आहेत.
या एनएफओला सुमारे सव्वा लाख गुंतवणूकदारांनी प्रतिसाद दिला आहे. आता या फंडाच्या युनिटचे बाजारात व्यवहार सुरू झाले आहेत. या फंडाचा पैसा शेअर बाजारात गुंतवताना मानवी ज्ञानाबरोबरच संगणकीय नियमांच्या अचूकतेवरही भर दिला जातो. त्यामुळे विशिष्ट शेअर घेण्याची हाव किंवा विकण्याची भीती या मुद्द्यांचे दडपण त्या निर्णयावर नसते. त्यामुळे शिस्तबद्ध रितीने गुंतवणूक होते.
शेअर केव्हा खरेदी करावे व कोणत्या किमतीला विकावे हे आधीच ठरलेले असल्याने कामात अचूकता असते. तसेच त्यामुळे वाढीव पारदर्शकता मिळते व तज्ञ आणि संगणक या दोघांचेही निर्णयावर लक्ष असते. त्यामुळे संतुलित आणि देखरेख असलेले खाते तयार होते. आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीचे एमडी आणि सीईओ ए बालसुब्रमणियन यांनी या प्रतिसादाबद्दल गुंतवणूकदारांचे आभार मानले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.