मंगळसूत्र लांबवण्याचा प्रकार फसला

मंगळसूत्र लांबवण्याचा प्रकार फसला

Published on

वाडा, ता. ८ (बातमीदार) : कुडूस येथील संत रोहिदास नगर परिसरात ६८ वर्षीय महिला शेतावरून परतत असता तिला एकाकी गाठून गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न झाला, मात्र महिलेच्या चलाखीमुळे हा डाव फसला. ही घटना आज (ता. ८) दुपारी बैठकीच्या सभागृहाजवळ घडली.

कुडूस येथील संत रोहिदास नगरमधील रहिवासी असलेल्या विमल हरिचंद्र जाधव या आपल्या शेतावरून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत होत्या. त्यावेळी चारचाकीमधून उतरलेल्या एका भामट्याने बोलण्यात गुंतवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला असता, विमल यांनी त्याच्या हाताला जोराचा चावा घेतला. या झटापटीत होणारा जोराचा आवाज ऐकून इरफानभाई सुसे यांच्या शेतात असलेली मजूर माणसे धावत येताच भामट्याने आपला हात सोडवून रिकाम्या हाती पळ काढत वाहनामधून फरार झाला. कारमध्ये आणखी चौघे असल्याचे दिसून आले. महिलांनी अशा वेळी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून प्रसंगाला प्रतिकार केला पाहिजे, असे विमल जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.