मुंबईकरांना मेट्रोचा हात

मुंबईकरांना मेट्रोचा हात

Published on

मुंबईकरांना मेट्रोचा हात
सायंकाळी सहापर्यंत दीड लाख जणांचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : धुवाधार पावसामुळे सोमवारी मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरल्याने रस्ते आणि लोकल वाहतूक ठप्प झालेली असतानाच मेट्रोने मात्र प्रवाशांना मदतीचा हात दिला. पश्चिम उपनगरातील प्रवाशांनी बेस्ट आणि लोकलऐवजी मेट्रो २-अ आणि मेट्रो-७ ने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे एरवी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मेट्रो प्रवाशांची एक-सव्वा लाखाच्या घरात असलेली संख्या आज एक लाख ४१ हजार १४९ हजारावर पोहोचली होती. रात्री उशिरापर्यंत मेट्रोला प्रवाशांची मोठी गर्दी होती. मेट्रो-अ आणि ७ या मेट्रो मार्गावर दररोज सुमारे २८२ फेऱ्या चालवल्या जात असून सुमारे सव्वा दोन-अडीच लाख प्रवासी ये-जा करतात. मात्र, सोमवारी शाळा- कॉलेजला सुट्टी असताना आणि अनेकांनी घरीच राहणे पसंत केलेले असतानाही मेट्रो प्रवाशांची संख्या सायंकाळी दीड लाखाच्या घरात गेल्याचे मुंबई मेट्रो स्पष्ट केले आहे. दरम्यान, आज दिवसभर पाऊस असतानाही मेट्रो वेळेवर धावत होती. त्यामुळे रात्री उशिरा घरी निघालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.