ग्राहक संस्थांना नवे मार्ग शोधावे‌‌ - सचिन अहिर

ग्राहक संस्थांना नवे मार्ग शोधावे‌‌ - सचिन अहिर

ग्राहक संस्थांनी नवे मार्ग शोधावे‌‌ - सचिन अहिर

शिवडी, ता. ९ (बातमीदार) : आजच्या स्पर्धात्मक युगात सहकारी ग्राहक संस्थांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे, यातून मार्ग काढण्यासाठी नवनवी क्षेत्र निवडावी लागणार असल्याचे मत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. ७) महात्मा गांधी सभागृहात पार पडली. त्यावेळी सचिन अहिर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
गोविंदराव मोहिते होते.
आमदार सचिन‌ अहिर म्हणाले की, ऑनलाईनच्या जमान्यात क्षणात एकादी वस्तू ग्राहकाला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या स्पर्धात्मक वातावरणात सहकारी संस्था वृद्धिंगत कशा करता येणार आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावर आजच्या ग्राहक संस्थांना, पतसंस्थांना, व्यावसायिक तत्त्वावर आधारित ग्राहक केंद्र उभारणीसारखे नवे उपक्रम शोधावे‌‌‌ लागतील, असे‌ही त्यांनी सांगितले. रखडलेल्या गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर आम्ही विधान परिषदेत सरकारला जाब विचारणार असल्याचे सांगत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर नक्कीच या प्रश्नाला प्राधान्य दिले जाईल, असे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले. अध्यक्ष गोविंदराव मोहिते व पाहुण्यांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी लाली अहिर, निवृत्ती देसाई, रघुनाथ शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, शिवाजी काळे, मारुती शिंत्रे महाव्यवस्थापक विलास डांगे, शोभा परब, आशा आसबे, जी. बी. गावडे, बळीराम महाडिक उपस्थित होते.

MUM२४E५७८७३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com