लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष

लाडकी बहीण योजनेसाठी मदत कक्ष

भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी, त्याचप्रमाणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ पात्र महिला लाभार्थ्यांना सहजरितीने मिळावा, या दृष्टीने मिरा-भाईंदर महापालिकेने प्रत्येक प्रभाग कार्यालयात मदत व नोंदणी कक्ष सुरू केला आहे. या कक्षासाठी प्रभाग अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या कक्षाचा संबंधितांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेची सहा प्रभाग कार्यालये आहेत. त्यात प्रभाग कार्यालय एकमध्ये स्वप्नील सावंत (संपर्क क्रमांक ८४२२८११४०१), प्रभाग दोनमध्ये संजय दोंदे (८४२२८११३०९), प्रभाग तीनमध्ये जितेंद्र कांबळे (८४३३९११९७६), प्रभाग चारमध्ये प्रियांका भोसले (८४३३९११९७६), प्रभाग पाचमध्ये कविता बोरकर (७९७२५३९७१८) व प्रभाग सहामध्ये प्रभाकर म्हात्रे (८९७६६४३९८९) यांची समन्वय तथा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी योजनेच्या माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा. कक्षात योजनेचे ऑफलाईन अर्ज व नारीशक्ती दूत ॲपवरून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीही लाभार्थ्यांना तत्काळ साह्य केले जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्याकरिता महिला लाभार्थ्यांनी काही अटी-शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिला लाभार्थ्यांनी आधारकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र/पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड, अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला (अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला), अर्जदाराचे हमीपत्र, तसेच महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र, १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला), बँक पासबुक ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com