बालकांसाठी कामा रुग्णालयाचा आधार

बालकांसाठी कामा रुग्णालयाचा आधार

Published on

बालकांसाठी कामा रुग्णालयाचा आधार
लसीकरणाची एक दिवस आधीच माहिती, २०२३ मध्ये १९ हजारांवर मुलांना फायदा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्य सरकार संचालित कामा ॲण्ड आल्ब्लेस रुग्णालय मुलांच्या आरोग्यासाठी आधार बनले आहे. कारण येथे वर्षानुवर्षे बालकांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, येथील डॉक्टर आणि परिचारिका विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाची काळजी घेत आहेत. बाळाचा जन्म ते वयाची १६ वर्षे पूर्ण होईपर्यंत बाळाचे लसीकरण केले जाते. त्यामुळे लसीकरणाच्या तारखेच्या एक दिवस आधीच पालकांना संदेश पाठवून आठवण करून दिली जाते. तसेच पालकांना लसीकरणाचे महत्त्वही समजावून सांगितले जाते.

कामा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले की, २०२१ मध्ये रुग्णालयात लसीकरण झालेल्या लाभार्थी बालकांची संख्या १४ हजार ८२२ होती, तर २०२२ मध्ये ही संख्या १८ हजार ९१४ पर्यंत वाढली आहे. मागील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये या रुग्णालयात सुमारे १९ हजार बालकांचे लसीकरण करण्यात आले. तर गेल्या तीन वर्षांत सुमारे ५० हजार मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
............................
यू विन पोर्टलवर नोंदणी :
ऑगस्ट २०२३ पासून, यू विन पोर्टलवर लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी केली जाते. या पोर्टलद्वारे पालकांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर वेळेपूर्वी लसीकरण करण्याबाबत माहिती मिळते. २०२३ पूर्वी मुलांचे लसीकरण वेळेवर व्हावे, यासाठी रुग्णालयातील कर्मचारी पालकांना फोनद्वारे माहिती देत ​​असत, मात्र आताही त्याची काळजी घेतली जाते, असेही डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.
.............................
लसीकरण गरजेचे
जन्मानंतर २४ तासांच्या आत बालकाला टीबी, हिपॅटायटीस आणि पोलिओची लस दिली जाते. दीड ते साडेतीन महिन्यात बालकांना ओरल पोलिओ, रोटा व्हायरस, पीसीव्ही (न्यूमोनिया), आयपीव्ही अशा पाच प्रकारच्या लसी दिल्या जातात. मुले अडीच महिन्यांची झाल्यावर त्यांना पीसीव्ही, ओपीव्ही आणि रोटा व्हायरस लस दिली जाते.
..................................
१६व्या वर्षी बूस्टर डोस
गोवर, रुबेला, डांग्या खोकला, व्हिटॅमिन ए, पोलिओ इत्यादी लसीकरण १० ते १६ महिन्यांच्या दरम्यान केले जाते. त्यानंतर पाच, दहा आणि सोळा वर्षे वयाच्या मुलांना टिटॅनस, जीवनसत्त्वे इत्यादींचा बूस्टर डोस दिला जातो.
.................................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.