डहाणूत वृद्ध महिलेची 
८२ लाखांची फसवणूक

डहाणूत वृद्ध महिलेची ८२ लाखांची फसवणूक

डहाणू, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील रायतळी येथील वृद्ध आदिवासी महिलेला मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गात संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यापैकी तब्बल ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आशागड गावचे सरपंच प्रकाश बच्चू धोडी यांच्याविरोधात डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशागडजवळच्या रायतळी गावात सुकरी लक्षा रावते (वय ७५) यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. २०२१ मध्ये धोडी यांनी तिची जमीन मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्गात जाणार असून त्याचे पैसे मिळणार असल्याचे सांगत डहाणू उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात घेऊन गेले. तेथे अंगठा घेतल्यानंतर बँकेत नेत खाते उघडले. बँक पासबुक, चेकबुक आणि एटीएम कार्ड धोडी यांनी स्वतःकडे ठेवले. एप्रिलमध्ये नातवाच्या लग्नासाठी पैसे काढण्यास बँक खाते तपासले असता पैसे नसल्याचे सांगण्यात आले. बँक स्टेटमेंट पाहिले असता बँक खात्यावर सरकारकडून जमिनीचा मोबदला म्हणून एक कोटी २२ लाख रुपये जमा झाल्याचे समजले. धोडी आणि त्यांचा मुलगा हर्षद धोडी यांनी ८२ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हणण्यात आले, तसेच जाब विचारण्यासाठी गेले असता दोघांनी दमदाटी करून मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com