पिता-पुत्राची लोकलखाली आत्महत्या

पिता-पुत्राची लोकलखाली आत्महत्या

Published on

नालासोपारा (बातमीदार) : भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ पिता-पुत्राने लोकलखाली आत्महत्या केली होती. याप्रकरणाची वसई लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वसई पूर्व एव्हरशाईन परिसरातील हरीश मेहता (वय ६५), जय मेहता (वय ३२) हे दोघे सोमवारी (ता. ८) सकाळी अकराच्या सुमारास भाईंदर रेल्वे स्थानकात उतरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे. भाईंदर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ६ वरून दोघे जण चर्चगेटच्या दिशेने गेले. या वेळी लोकल येताच दोघेपण ट्रॅकवर झोपल्याचे दिसून आले. त्यामुळे मोटरमनला त्यांना वाचवण्याची संधी मिळाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.