भाडेपट्टा सवलती दरात द्या

भाडेपट्टा सवलती दरात द्या

भाडेपट्टा सवलती दरात द्या
स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांसाठी मकरंद नार्वेकर यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला (आरडब्ल्यूआयटीसी) भाडेतत्त्वावर दोन कोटींची सवलत महायुती सरकारने दिल्यानंतर, भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबईतील इतर स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांना आकारल्या जाणाऱ्या भाडेदरामध्ये सवलतीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी पत्र लिहून ही मागणी केली आहे.

राज्य सरकारने गेल्या महिन्यात रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबचे लीज भाडे तीन कोटींवरून दोन कोटी करण्यात आले आहे. रेसकोर्सच्या बांधकाम असलेल्या जागेवरच भाडे आकारणी केली जाईल, खुल्या जमिनीवर करणार नसल्याचेही राज्य सरकारने नमूद केले आहे. विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब, हिंदू जिमखाना, पारसी जिमखाना, कॅथोलिक जिमखाना, बॉम्बे जिमखाना, इस्लाम जिमखाना अशा जिमखाना आणि क्लबसाठी हाच नियम लागू केला पाहिजे. या सर्वांचे त्यांच्या जमिनीवर महालक्ष्मी रेसकोर्ससारखे अत्यल्प बांधकाम आहे आणि त्यांनी शहराच्या सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे ते रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब प्रमाणेच कमी भाडे आकारणीसाठी ते पात्र आहेत, असे नार्वेकर यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.

स्पोर्ट्स क्लब आणि जिमखान्यांसाठी एक आदर्श धोरण राबविले गेले पाहिजे. आरडब्ल्यूआयटीसीच्या धोरणात अलीकडील बदल लक्षात घेता, इतर क्लब्स आणि जिमखान्यामध्ये अशी धारणा वाढत आहे की बांधकाम नसलेल्या क्षेत्रांसह संपूर्ण भूखंडांवर भाडे आकारणी असल्याने त्यांना अन्यायकारक वागणूक दिली जात आहे. म्हणून एक आदर्श भाडे आकारणी धोरण असायला हवे. कोणताही पक्षपात न करता समानता सुनिश्चित करेल आणि त्यांच्यावरील अन्याय दूर करेल, असेही नार्वेकर यांचे म्हणणे आहे.

..
‘एआरसी’ क्लबचे पुनर्वसन करण्याची मागणी
महालक्ष्मी रेसकोर्सवर मुंबईत कोणतेही बांधकाम न करता १२० एकरचे सेंट्रल पार्क उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घेतला असून उर्वरित ९१ एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुनर्विकास योजनेत ॲमॅच्युअर रायडर्स क्लबचे (एआरसी) पुनर्वसन करावे, त्यामुळे शहरात घोडेस्वारी आणि इतर खेळांचे प्रशिक्षण सुरू राहील, असेही मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com