ठाण्यात टॅंकरच्या फेऱ्या

ठाण्यात टॅंकरच्या फेऱ्या

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : दोन दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पिसे, शहाड येथील जलशुद्धी केंद्राजवळील नदीपात्रातील साचलेला गाळ, कचरा काढण्यासाठी तीन दिवस ठाणे शहरात ५० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एकीकडे मुंबई-ठाणे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून दुसरीकडे रहिवाशांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
महिनाभरापासून मुंबई महापालिकेने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात केली होती. अशातच भातसा धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्याने पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला आहे. या जलशुद्धी केंद्रावरील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, पण त्यामुळे ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेने पुढील मंगळवारपासून पुढील दोन दिवस अनियमित पाणीपुरवठा सुरू असल्याने ऐन पावसाळ्यात अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
----------------------------------------
गृहसंकुलांना सर्वाधिक फटका
- ठाणे शहरातील मध्यवर्ती भागासह घोडबंदर भागात होणारा पाणीपुरवठादेखील विस्कळित झाल्याने गृहसंकुलांमधील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. दिवसातून अर्धा ते पाऊण तास पाणी उपलब्ध होत असून तोही पुरेशा दाबाने होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. अनेक संकुलांमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
- नागरिक पाण्याचे मोठे बाटले विकत घेत असून पाणी विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आला आहे. चाळी आणि इमारतींमधील नागरिकांकडून टँकर मागवण्यात येत असल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. टँकरच्या दररोज ३० ते ४० फेऱ्या शहरात होतात, पण त्यामध्ये ३० ते ४० फेऱ्या वाढल्या आहेत. रविवारी दिवसभरात ७१ तर, सोमवार दुपारपर्यंत २८ अशा एकूण ९९ टँकरच्या फेऱ्या शहरात झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.