बाह्यवळण मार्गावर दरड कोसळली

बाह्यवळण मार्गावर दरड कोसळली

Published on

कळवा (बातमीदार)ः दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्गावर डोंगराचे पाणी जाण्यासाठी चर खोदण्याचे काम सुरू असताना दरड कोसळली. सोमवारी (ता. ९) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरड कोसळल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत माती हटवण्याचे काम सुरू केले होते. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही; परंतु पावसाचा जोर वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन वाहनचालकांना केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.