रिक्षा, टॅक्सी चालकांना हवी भाडेवाढ

रिक्षा, टॅक्सी चालकांना हवी भाडेवाढ

Published on

रिक्षा, टॅक्सीचालकांना हवी भाडेवाढ
सीएनजी महागल्याने मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : सीएनजीच्या दरात दीड रुपयाने, तर पीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. सीएनजी महागल्याने रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी भाडेवाढीची मागणी केली असून त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर २०२२मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात अनुक्रमे दोन आणि तीन रुपयांनी वाढ केली होती. त्या वेळी रिक्षाचे भाडे २१ रुपयांवरून २३ करण्यात आले होते, तर टॅक्सीचे भाडे २५ रुपयांवरून २८ रुपये करण्यात आले. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच देखभाल आणि वाहनांच्या दुरुस्तीच्या खर्चामुळे भाडे परवडत नसल्याचे रिक्षा आणि टॅक्सीचालकाचे म्हणणे आहे. सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयाने वाढ होणार असून मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागत आहे, तर पीएनजीच्या दरात एक रुपयाने वाढ झाली असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका झाला आहे. दरम्यान, सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता मुंबईतील वाहनधारकांना याचा मोठा फटका बसला आहे. आता सीएनजीच्या खरेदीसाठी वाहनधारकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे.
...
आता सीएनजीच्या दरात दीड रुपयाने वाढ झाली आहे. सध्याचे मूळ भाडे २३ रुपये असून मुंबईमध्ये २२ ऑक्टोबर २०२२पासून रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात वाढ झाली नाही. वाढत्या ग्राहक किंमत निर्देशांक पाहता दोन रुपये भाडेवाढ व्हावी. भाडेवाढीमध्ये सर्व नियम आणि घटक यांचा विचार केला आहे. यामध्ये सध्याच्या राहणीमानाचा खर्च, दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च, भांडवली खर्च, विमा आणि कर आणि मुंबईत वाहन चालवण्याचा इंधन खर्च यांचा समावेश आहे. त्याकडे सरकार लक्ष द्यावे. 
- थॅम्पी कुरियन, नेते, मुंबई रिक्षा मेन्स युनियन
...
इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत तसेच देखभाल आणि वाहनांच्या दुरुस्तीच्या खर्चामुळे भाडे परवडत नसून टॅक्सीच्या भाड्यात दोन रुपयांची वाढ करावी.
- विजय भावे, टॅक्सीचालक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.