एसटी कर्मचाऱ्यांचे  आझाद मैदानत आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांचे  आझाद मैदानत आंदोलन

Published on

एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ९ : विविध आर्थिक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्या वतीने ९ व १० जुलै रोजीच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. ९) पहिल्या दिवशी तोडगा न निघाल्याने  दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती समितीने दिली. 
प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीच्या दराचा फरक एकरकमी अदा करणे, चार हजार ८४९ कोटींधील उर्वरित रक्कम मूळ वेतनात अदा करणे, मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार, अडीच हजारांऐवजी सरसकट पाच हजार वाढ मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन केली आहे. या कृती समितीच्या वतीने  आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू असून आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.