ठाणेकरांना प्राणीसंग्रहालयाची भेट

ठाणेकरांना प्राणीसंग्रहालयाची भेट

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ ः तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात वनखात्याच्या १५० एकर जमिनीवर राणीच्या बागेप्रमाणे प्राणी संग्रहालय आणि जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर उद्यान निर्मिती होणार आहे. या प्रस्तावाला मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून ‘नमो पार्क’नंतर ठाणेकरांना प्राणी संग्रहालयाची अनोखी ‘भेट’ मिळणार आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात एक बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा परिसर सोडून वनखात्याच्या १५० एकर जमिनीवर मुंबईतील भायखळा जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती करावी, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला मान्यता देताना वनखात्याच्या प्रधान सचिवांना ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रस्तावित जागेवर बाबूंच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे, तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी उद्यानांमध्ये असणार आहेत. यासाठी वनखात्याच्या नियमांनुसार प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तेवढेच बांधकाम केले जाणार आहे. त्यापैकी बहुतांश बांधकाम लाकडाचे असणार आहे.
-------------------------------------------
ठाणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता सिमेंटच्या जंगलात पर्यावरणाचे संतुलन रहावे यासाठी प्रयत्न होत आहेत. याच धर्तीवर महापालिका हद्दीमध्ये कोलशेत भागात ‘नमो उद्यान’नंतर आता प्राणी संग्रहालय उद्यान झाल्यास त्याचा आनंद ठाणेकरांना मिळू शकतो.
- प्रताप सरनाई, आमदार, ओवळा-माजिवडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com