प्रेम प्रकरणातून तरुणीचा हत्या

प्रेम प्रकरणातून तरुणीचा हत्या
Published on

ठाणे, ता. ९ (वार्ताहर)ः ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरात २६ वर्षीय घटस्फोटित तरुणी दोन दिवसांपूर्वी घरातच मृतावस्थेत आढळली होती. या तरुणीच्या शरीरावरील जखमांमुळे तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगरमध्ये शिवसदन इमारतीत राहणाऱ्या प्रियंकाचा (वय २६) मृतदेह सापडला होता. मूळची जळगावची रहिवासी असलेली प्रियंका ठाण्यात एकटीच राहत होती. काही दिवसांपूर्वीच तिने नोकरी सोडले होती. नेहमी नातेवाईकांशी संपर्कात असलेली प्रियंका तीन दिवसांपासून तिच्या कुटुंबीयांशी संपर्कात नव्हती. अशातच घरातून दुर्गंधी सुटल्याने केलेल्या तपासात पोलिसांना तिचा मृतदेह सापडला होता. ही हत्या प्रेमप्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे; पण पोलिसांनी तसा दुजोरा दिलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.