टोरंट पॉवरच्या प्रीपेड सर्वेक्षणाबाबत अफवा

टोरंट पॉवरच्या प्रीपेड सर्वेक्षणाबाबत अफवा

Published on

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि शीळ-मुंब्रा-कळवा या ठिकाणी टोरंट पॉवर लि. ही वीज कंपनी नागरिकांना वीजपुरवठा करते. तसेच वीजबिल वसुली करण्याचे काम करीत आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून टोरंट पॉवर प्रीपेड मीटर किंवा अन्य कारणांसाठी सर्वेक्षण करत असल्याच्या समाजमाध्यमांवर अफवा पसरत आहेत. त्यामुळे भिवंडी, कळवा, मुंब्रा आणि शीळ येथील नागरिकांनी या पसरणाऱ्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन कंपनीद्वारे करण्यात आले आहे. टोरंट पॉवरने कोणतेही सर्वेक्षण सुरू केलेले नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर पसरवण्यात आलेली माहिती निराधार आहे. जनतेची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने काही व्यक्ती जाणीवपूर्वक या अफवा पसरवत आहेत. वीज संबंधित कोणत्याही समस्येसाठी ग्राहकांनी टोरंट पॉवर हेल्पलाईन अथवा आमच्या ग्राहक सेवा केंद्रांना भेट द्यावी, असे आवाहन टोरेंट वीज कंपनीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.