पालिकेचे नियोजन फसले

पालिकेचे नियोजन फसले

पालिकेचे नियोजन फसले
विरोधी पक्षांचे प्रशासनावर ताशेरे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईत सहा तासांत पडलेल्या पावसाने पाणी भरले. वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. पालिकेच्या नियोजनाचा बोजवारा उडाला. त्याबाबत राजकीय पक्षांनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

रस्त्यांची कामे रखडल्याचा फटका मुंबईला बसला. रस्त्यांची कामे नियोजित वेळेत पूर्ण झाली नाहीत, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची घोषणा झाली, मात्र या कामांसाठी कंत्राटदार मिळेनात, अशी परिस्थिती निर्माण झाली. पाच वेळा निविदा काढाव्या लागल्या. त्यामुळे रस्त्यांच्या कामाचे नियोजन ढेपाळल्याचे आढळून आले. नालेसफाईचे कामे कंत्राटदाराने योग्य प्रकारे केली नाहीत, असा आरोप विरोधी आणि सत्ताधारी पक्षांकडून केला जात होता. गेले दोन दिवस झालेल्या पावसाने नालेसफाईची पोलखोल झाली.

मेट्रोच्या कामामुळे नाले आणि रस्ते तोडून ठेवले आहेत. त्यामुळेही अनेक भागात पाणी भरले, मात्र मेट्रोच्या कामामुळे नाले, रस्त्यांचे नुकसान होते. त्या नुकसानीचा खर्च पालिकेलाच करावा लागतो. त्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मेट्रोमुळे होत असलेल्या नुकसानीचा खर्च मेट्रोकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे.
..
लोकसभा निवडणुकीच्या कामांमुळे नालेसफाईच्या कामाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. नालेसफाईच्या कामाचे नियोजन पालिकेने योग्य प्रकारे केले नाही. कंत्राटदारांनी योग्य प्रकारे कामे केली नाहीत. नालेसफाईच्या कामाचे पर्यवेक्षण झाले नाही. प्लास्टिकच्या वाढलेला वापर याचा परिणाम ठिकठिकाणी दिसून आला.
- भालचंद्र शिरसाट, प्रवक्ता, भाजप, माजी नगरसेवक
-------------
केवळ सहा तास पाऊस तर मुंबईची अशी परिस्थिती झाली. पालिका प्रशासनाने केलेल्या कामाचे नियोजन योग्य प्रकारे झाले नसल्याने फ्लडिंग स्पॉट वाढत आहेत. जेथे पाणी तुंबत नव्हते, तेथे पाणी भरू लागले आहे. ढिसाळ नियोजनाचा हा परिणाम आहे.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका
..
रस्ते, नाले, नागरी सुविधांची कामे यासाठी पालिकेने कोट्यवधी खर्च करून सल्लागार नेमले, तरीही मुंबईत पाणी भरते, हे पालिका प्रशासनाचे अपयश आहे. नदी, नाले वर्षातून एकदा साफ करतात. ते वर्षभर सातत्याने साफ करण्याची गरज आहे. पैशांची केवळ उधळपट्टी आहे.
- राखी जाधव, अध्यक्षा, मुंबई, राष्ट्रवादी काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com