मराठा आरक्षण चर्चेपासून ठाकरे, पवारांनी पळू नये

मराठा आरक्षण चर्चेपासून ठाकरे, पवारांनी पळू नये

Published on

मराठा आरक्षण चर्चेपासून ठाकरे, पवारांनी पळू नये : प्रवीण दरेकर

मुंबई, ता. १० : मराठा आरक्षणाबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावलेल्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते अनुपस्थित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चेपासून पळ न काढता आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवणी दरेकर यांनी दिले आहे.

मराठा आरक्षणाबाबतचे महाविकास आघाडीचे पुतना मावशीचे प्रेम दिसून आले, असे दरेकर म्हणाले. सरकारने पुढाकार घेऊन आरक्षणाविषयी मार्ग काढावा आणि निर्माण झालेली जातीय तेढ संपवावी, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला शरद पवारांनी दिला होता. राज्यात सलोख्याचे वातावरण निर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीस विरोधी नेते जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिले. हा प्रश्न असाच भिजत राहावा आणि त्याआधारे महाराष्ट्रात जातीय संघर्ष पेटत राहावा, त्या पेटलेल्या धगीवर आपली राजकीय पोळी भाजावी, अशा प्रकारचा विचार ‘मविआ’च्या नेत्यांच्या मनात असल्याचे अनुपस्थितीवरून दिसून आल्याचेही दरेकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी, ‘मविआ’ची नेमकी काय भूमिका आहे ती लेखी स्वरूपात मागवावी, ह्यांचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येऊ दे,’ असे बैठकीत सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही असेच सांगितल्यामुळे आज आम्ही विधान परिषदेत हा विषय मांडला. विरोधकांनी चर्चेपासून पळू नये, जितके पळाल तितका तुमचा ढोंगीपणा महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल.
- प्रवीण दरेकर, भाजप गटनेत, विधान परिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.