नाखवा कुटुंबाला १० लाखांची मदत जाहीर

नाखवा कुटुंबाला १० लाखांची मदत जाहीर

Published on

नाखवा कुटुंबाला १० लाखांची मदत जाहीर

मुंबई, ता. १० ः वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांना विशेष बाब म्हणून १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. नाखवा कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई सागरी किनारा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
या प्रकरणातील कोणी कितीही मोठा असला, तरीही त्याला पाठीशी घातले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण घडल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण पोलिसांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर आपण ठाम आहोत, असेही शिंदे म्हणाले. तसेच वरळी हिट ॲण्ड रनच्या घटनेनंतर आरोपीचे वडील राजेश शहा यांना आज पक्षातून पदमुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील नियम मोडणाऱ्या बार, पब आणि मद्यविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत; तसेच अनधिकृतपणे चालणारे बार आणि पब जमीनदोस्त करण्याचे निर्देश आपण संबंधित पालिका आयुक्तांना दिले असल्याचेही मुख्यमंत्र्यानी सांगितले. या प्रकरणांना आळा बसावा यासाठी ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हची तपासणी आणि गस्त वाढवण्याचे निर्देशही पोलिसांना दिले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.