मुंबईच्या भाजप कोअर कमिटीची बैठक

मुंबईच्या भाजप कोअर कमिटीची बैठक

विधानसभेची रणनीती ठरविण्यासाठी
मुंबई भाजप कोअर कमिटीची बैठक
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १० ः विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची बुधवारी बैठक झाली. मुंबईत महायुतीला मिळालेली मते महाविकास आघाडीपेक्षा अधिक असली, तरी ती उत्तर मुंबईशी संबंधित आहेत. दलित, मुस्लिम मतांची आघाडी मोडून काढण्यासाठी नेमके काय करता येईल, याचा विचार या बैठकीत सविस्तरपणे मांडण्यात आल्याचे समजते. मुंबईत भाजपचा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्रासाठी नेमलेले निवडणूक निरीक्षक केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी खासदार गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, प्रसाद लाड यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुंबईत भाजपला अत्यंत मर्यादित यश मिळाल्याने या बैठकीत गंभीर चर्चा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com