ज्येष्ठ नागरिकांतर्फे पल्लवी पाटील यांचा सत्कार

ज्येष्ठ नागरिकांतर्फे पल्लवी पाटील यांचा सत्कार

Published on

ज्येष्ठ नागरिकांतर्फे पल्लवी पाटील यांचा सत्कार

मुलुंड, ता. ११ (बातमीदार) : ज्येष्ठ नागरिक संघ मुंबई प्रादेशिक विभाग यांच्यातर्फे ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांच्या पत्नी आणि समाजसेविका पल्लवी पाटील यांचा बुधवारी (ता. ११) भांडुप पश्चिम येथे सत्कार करण्यात आला.
पल्लवी पाटील यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये सातत्याने कार्य केले आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात. या त्यांच्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. जळगांव येथील जैन इरिगेशनचे मालक अभय जैन यांच्याकडूनही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही भेट घेऊन त्यांच्या कामाबद्दल भावना व्यक्त केल्या.
पल्लवी पाटील यांनी आपल्या संस्थेतर्फे विवाह जुळवून आणले आहेत, तसेच बचत गटामार्फत अनेक महिलांना रोजगारही त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. याप्रसंगी जीवनदान संस्थेच्या अध्यक्षा राजोल पाटील, सुरेश नंदिरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MUM24-E58078

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.