विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांपासून बनवल्या कागदी पिशव्या

विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांपासून बनवल्या कागदी पिशव्या

Published on

वाशी, ता. ११ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत सद्यस्थितीत सुरू असलेल्या ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या मोहिमेमध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेसोबत प्लास्टिक प्रतिबंधाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सीवूड्स येथील एस. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्लास्टिकपासून होणारी मानवी जीवनाची व निसर्गाची हानी पटवून देण्यात आली. तसेच प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी, कागदी पिशव्यांचा पर्यावरणपूरक पर्याय वापरात आणावा, यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी वर्तमानपत्रांपासून आकर्षक कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. रद्दीत जाणाऱ्या वर्तमानपत्रांचा उपयोग पिशव्यांकरिता होत असल्याने व तोही स्वत:च्या हाताने पिशव्या बनवून केला जात असल्याने विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. याप्रसंगी स्वच्छता व प्लास्टिक प्रतिबंधात्मक तसेच माझी वसुंधरा अभियानाची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक संतोष पाटील व ज्योत्स्ना नायर यांच्यासह शिक्षक तसेच बेलापूर विभागातील सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.