हिवताप, डेंगीविरोधात पालिकेचा अॅक्शन प्लॅन

हिवताप, डेंगीविरोधात पालिकेचा अॅक्शन प्लॅन

Published on

हिवताप, डेंगीविरोधात पालिकेचा अॅक्शन प्लॅन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः पावसाळ्याचे तीन महिने मलेरिया आणि डेंगीचे रुग्‍ण मोठ्या प्रमाणात आढळतात. पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
मुंबई हे मलेरियाप्रवण क्षेत्र आहे. मुंबईतून मलेरिया निर्मूलनासाठी सूक्ष्म उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र शासन, पालिका आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या समन्वयाने मलेरिया आणि डेंगीचे निर्मूलन करण्याच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त संचालक (राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र, नवी दिल्ली) डॉ. आर. एस. शर्मा, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. बद्री थापा, तांत्रिक अधिकारी डॉ. रूप कुमारी, डॉ. नागपाल तसेच पालिकेच्या २४ विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी, २४ विभागाचे कीटकनाशक अधिकारी यांच्या समन्वयाने मलेरिया आणि डेंगी प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यात येत आहेत.
समुदाय जागरुकता करून
सूक्ष्म योजना आखून काम करण्याचे ठरले असून त्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.