प्ल्मंबर, लिफ्टमनला खंडणीप्रकरणात अटक

प्ल्मंबर, लिफ्टमनला खंडणीप्रकरणात अटक
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ ः सतत आजारी असल्याने ज्योतिषाला हात दाखवण्याची फूस लावून माजी नगरसेविकेचा पती तथा केबल व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवत तिघांनी पैसे चोरले होते. या प्रकरणात अटक आरोपींपैकी दोघेजण प्लंबर, लिफ्टमनचे काम करतात.
कल्याण पूर्वेतील केबल व्यावसायिक विजय गायकवाड काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत गिरीश खैरेने गायकवाड यांना ज्योतिषाकडे घेऊन जात असल्याचा बनाव रचला. त्यानंतर गायकवाड यांना आडीवलीतील एका इमारतीत नेण्यात आले. जिथे गिरीशचा साथीदार विनायक कराडेसोबत विनय यादव हादेखील उपस्थित होता. तिघांनी गायकवाड यांना बंदुकीचा धाक दाखवत २७ हजारांची रोख रक्कम आणि तीन महागडे फोन चोरले होते.
----------------------------------------------
बिहारमधून आणला देशी कट्टा
विजय गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांमार्फत शोध घेत प्रकरणातील मुख्य सूत्रधार गिरीश खैरेला अटक केली. तपासात विनायक कराडे आणि विनय यादव या दोघांची नावे समोर आली. विनायक कराडे हा लिफ्टमन असून विनय हा प्लंबरचे काम करतो. पोलिसांनी दोघांकडून बिहारमधून आणलेला देशी कट्टा जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com