गर्भवती युवतीची पुलाखाली प्रसूती

गर्भवती युवतीची पुलाखाली प्रसूती
Published on: 

गर्भवती युवतीची पुलाखालीच प्रसूती
बाळ दगावल्याने नातेवाइकांचे कळवा रुग्णालयाबाहेर आंदोलन
कळवा ता. १७ (बातमीदार) ः अल्पवयीन गर्भवतीची पुलाखाली प्रसूती झाल्याने सात महिन्यांचे बाळ दगावल्याचा प्रकार कळव्यात घडला. प्रसूतीवेदना होत असलेल्या मुलीवर उपचारांऐवजी पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले. या प्रकाराने संतापलेल्या युवतीच्या नातेवाइकांनी डाॅक्टरचे निलंबन करावे, अशी मागणी करत रुग्णालयाबाहेर आंदोलन केले.
ठाण्यातील क्रांतीनगर परिसरात एका अल्पवयीन तरुणीची ठाण्यातील खोपट परिसरातील तरुणाशी ओळख झाली होती. त्याने लग्नाच्या भूलथापा देऊन तिला गुजरातमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले होते. त्यातून तरुणी गर्भवती राहिल्याने त्या तरुणाने पुन्हा तिला ठाण्यात आणून सोडले. अशातच पीडितेला बुधवारी (ता. १६) सायंकाळी प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने नातेवाइकांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तरुणी अल्पवयीन असल्याने डाॅक्टरांनी पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगून उपचार करण्यास नकार दिला. परिणामी, पीडितेची रुग्णालयाबाहेरील क्रांतीनगर येथील पुलाखालीच प्रसूती झाली, पण तिचे सात महिन्यांचे बाळ दगावल्याने यासाठी डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. तसेच ठाणे पालिका आयुक्तांना निवेदन देऊन संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी समाजसेवक संघम डोंगरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.