

वाडा, ता. २२ (बातमीदार) : विधानसभा निवडणूक प्रक्रियेत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम करणे अनिवार्य आहे. तालुक्यातील माध्यमिक शाळांतील बहुतांशी मुख्याध्यापकांनी जाणीवपूर्वक काम टाळण्यासाठी आपले नाव शासन स्तरावरून मागवण्यात आलेल्या कर्मचारी यादीत न दिल्याने ते निवडणूक कामापासून मुक्त राहिले आहेत. त्यामुळे निवडणूक कामात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करून सवाल उपस्थित केला आहे.
१५ व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला राज्यभर निवडणूक होत आहे. या निवडणूक कामी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामी नियुक्त केल्या आहेत. हे राष्ट्रीय काम असल्याने ते सक्तीचे देखील आहे, मात्र माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी मागवलेल्या यादीत आपली नावे जाणीवपूर्वक न दिल्याने ते या कामापासून अलिप्त राहिल्याने इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना काम का नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. निवडणुकीसारख्या अतिसंवेदनशील विषयात कर्तव्यात कसूर करणे ही गंभीर बाब असल्याचे इतर कर्मचाऱ्यांनी आपले म्हणणे व्यक्त केले आहे.
यासंदर्भात वाडा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी जयवंत कामडी यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला प्राप्त असलेल्या यादीप्रमाणे पुढील कार्यालयात माझ्या नावासहित याद्या पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जे मुख्याध्यापक निवडणूक कामापासून राहिले असतील, अशांच्या त्वरित नियुक्त्या करण्यात येतील.
- भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार, वाडा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.