

चेंबूर कॅम्प परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी
रहिवाशांना आजारांचा धोका
चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः मागील महिनाभरात चेंबूर कॅम्प परिसरात पिण्याचे पाणी दूषित येत असल्याने रहिवाशांना विकत पिण्याचे पाणी आणण्याची वेळ आली आहे. चेंबूर एम पश्चिम विभागांतर्गत चेंबूर कॅम्प परिसरात पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
या परिसरात खासगी विकसकातर्फे एसआरए प्रकल्प व इमातीचा पुनर्विकास होत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत आहे, मात्र या रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांना उलट्या, जुलाब यासारख्या साथींच्या रोगाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.
रहिवाशांनी पालिकेकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते आपला संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पालिकेने लवकरात लवकर उपाययोनजा करून स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
महिलांची फरपट
सकाळी नोकरीनिमित्त कामाला जाणाऱ्या महिलावर्गाची या पाण्याच्या समस्येमुळे भयंकर फरपट होत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येवर पालिका ठोस उपाययोजना कधी करणार, असा संतप्त सवाल या परिसरातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.