

२३ उमेदवारांनी घेतले ६६ अर्ज
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यात मंगळवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज घेणे व दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ठाणे, कोपरी पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मिरा-भाईंदर आणि कळवा-मुंब्रा या पाच विधानसभा मतदारसंघातून २३ उमेदवारांनी ६६ अर्ज पहिल्याच दिवशी घेतल्याचे दिसून आले, तर ठाणे विधानसभेसाठी पहिला उमेदवारी अर्जदेखील दाखल केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातून काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडूनदेखील उमेदवारी अर्ज घेतल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करीत आघाडी घेतली आहे, तसेच इतर पक्षांकडून उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात येत आहे. अशातच पक्षांच्या उमेदवारांसह काही इच्छुकांकडून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्यातदेखील आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
राईट टू रिकॉल पक्षाचा पहिला अर्ज दाखल
अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात शिंदेंना देण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह आठ उमेदवारांकडून २० उमेदवारी अर्ज घेतले आहेत, तर ठाणे विधानसभेसाठी मनसेसह अपक्ष अशा १३ उमेदवारांनी १९ उमेदवारी अर्ज घेतले आहे. यामध्ये राईट टू रिकॉल पक्षाने पहिला उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली, तर ओवळा-माजिवाडा मतदारसंघातून दोन उमेदवारांनी पाच अर्ज आणि मिरा-भाईंदर मतदारसंघातील १२ उमेदवारांनी २२ अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली, तसेच कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून एकही अर्ज घेतला नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.