दिवाळीत डोळ्यांचे करा संरक्षण
दिवाळीत डोळ्यांचे करा संरक्षण
फटाक्यांशी संबंधित दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : दिवाळीत डोळ्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे. फटाके आणि धुराच्या प्रदर्शनामुळे डोळ्यांना होणारी इजा आणि ॲलर्जी टाळण्यासाठी अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. फटाक्यांशी संबंधित अपघात, विशेषत: दिवाळीदरम्यान दरवर्षी डोळ्यांना दुखापत होते, ज्यात अनेकांना त्वरित उपचार न मिळाल्यास कायमस्वरूपी दृष्टिदोष होतो. दिवाळीत डोळ्यांच्या दुखापतीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे अलीकडील आकडेवारीवरून दिसून आले आहे.
रिफ्रॅक्टिव्ह सर्जन डॉ. सुप्रिया श्रीगणेश यांनी सांगितले की, दिवाळीच्या वेळी डोळ्यांना फटाक्यांच्या स्फोटांमुळे जखमा होतात. भाजणे, कॉर्नियल ओरखडे, गंभीर प्रकरणांमध्ये अगदी अर्धवट दिसणे, पूर्ण अंधत्व येते. अनेक जखमांमुळे दृष्टीचे नुकसान होऊ शकते.
फटाक्यांपासून किमान पाच मीटरचे सुरक्षित अंतर राखणे आणि दुखापतींचा धोका कमी करण्यासाठी संरक्षणात्मक चष्मा घालावा. फटाका शक्यतो हातात धरू नये, असे आवाहन डॉ. सुप्रिया यांनी केले आहे. दिवाळीच्या दरम्यान धूर आणि कणांच्या उच्च पातळीमुळे डोळ्यांची तीव्र जळजळ होऊ शकते, विशेषत: कोरड्या डोळ्यांना किंवा ॲलर्जी असलेल्या व्यक्तींना नेत्रतज्ज्ञ डोळ्यांमध्ये ड्रॉप्स घालण्याची, धुराच्या ठिकाणी दीर्घकाळ राहणे टाळण्याची शिफारस करतात.
दिवाळीच्या काळात आम्ही चोवीस तास आपत्कालीन विभागात डोळ्यांना इजा झालेले रुग्ण पाहतो. किरकोळ प्रकरणांवर प्रतिजैविकांनी उपचार केले जाऊ शकतात, तर गंभीर दुखापतींना अनेकदा दीर्घकाळ उपचार करावे लागतात. त्यामुळे लवकरात लवकर एखाद्या विशेषज्ज्ञ नेत्रसेवा केंद्राला भेट देणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. सुप्रिया श्रीगणेश
रिफ्रॅक्टिव्ह सर्जन
काय करावे?
हानिकारक रसायनांचा अतिरेकी संपर्क टाळण्यासाठी संरक्षणात्मक चष्मा वापरावा, डोळ्यांना थकवा येऊ नये, यासाठी स्वतःला हायड्रेट करा, घरातील हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी घरामध्ये एअर प्युरिफायर वापरा, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

