कळव्यात विहिरीत तरुणाचा मृतदेह

कळव्यात विहिरीत तरुणाचा मृतदेह
Published on

कळवा (बातमीदार) : कळवा पूर्वेला असलेल्या शिवशक्तीनगर येथे एका विहिरीत ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना शनिवारी (ता. २३) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. धर्मवीर मार्केटमागील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी कळवा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढून त्याची ओळख पटवली. मृताचे नाव गुड्डू खान (वय ३५) असून तो याच परिसरातील आहे. कळवा पोलिसांनी त्याचा मृतदेह कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com