आमदार मोहिते-पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करावी ः राम सातपुते

आमदार मोहिते-पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करावी ः राम सातपुते
Published on

आमदार मोहिते-पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करावी ः राम सातपुते
नातेपुते, ता. २४ ः विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केली असून तशाच प्रकारची पोस्ट एक्स (ट्विटर) केली आहे. आज दिवसभर ही पोस्ट चर्चेत होती.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यावेळीही विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या बंधूंमुळे प्रचारापासून अलिप्त राहिले होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषद दिली आहे. सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला मोठी आर्थिक ताकद दिली. तरीही त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले नाही. उलटपक्षी पराभवासाठी पैशांचे वाटप केले. भाजपच्या कार्यकर्त्यांना, पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे पक्षाने त्यांना निलंबित करावे, अशा प्रकारची मागणी सातपुते यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra School Education Principal Secretary Ranjit Singh Deol visited PM SHRI Zilla Parishad School, Ganori, appreciating its innovative teaching methods, AI lab, skill development initiatives and student-centric learning practices.
Mayawati Expels Akash Anand Father in Law from BSP
The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
MLA Uttamrao Jankar :
Marathi News Esakal
www.esakal.com