माजींना आजी होऊच देणार नाही!

माजींना आजी होऊच देणार नाही!
Published on

बदलापूर, ता. २४ (बातमीदार) : माझ्याविरोधात काम करण्यासाठी सगळे माजी एकत्र येऊन रणनीती आखून काम करत होते, मात्र जनतेने दाखवलेल्या विश्वासावर मी पाचव्यांदा आमदार झालो आहे. नाद करायचा, पण कथोरे यांचा कुठे? असे म्हणत, या माजींना आता भविष्यात मी कधी आजी होऊ देणार नाही, अशा कडक शब्दात किसन कथोरे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना धमकीवजा इशाराच दिला आहे.

मुरबाड मतदारसंघात होणारी निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि अंतर्गत दुफळीची मानली जात होती.
विजय मिळाल्यानंतर कथोरे यांनी मुरबाड, तसेच बदलापूर आणि ग्रामीण पट्ट्यातील मतदारांचे आभार मानले. या वेळी त्यांचे अश्रू थांबत नव्हते. आपल्या विजयात आपल्याच पक्षातील नेत्यांनी निर्माण केलेला अडसर आपण बाजूला करून, पाचव्यांदा आमदारकी मिळवली. हे संपूर्ण श्रेय मतदारसंघातील मतदारांचे असून, त्यांनी पाचव्यांदा माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळेच असंख्य अडचणींवर मात करत मला हा विजय मिळवता आला, असे भावनिक वक्तव्य कथोरे यांनी विजयानंतर केले. याचवेळी त्यांनी विरोधात काम करणाऱ्यांना, त्यांना मी एकच सांगेन, ते म्हणजे नाद करायचा पण, कथोरेंचा कुठे? आता मी निवडून आलो आहे. त्यामुळे या माजी नेत्यांना मी भविष्यात आजी होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशाराच त्यांनी नाव न घेता पक्षातील वरिष्ठ नेते जगन्नाथ पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना दिला आहे.

मंत्रिपदावर शंका?
२०१९ च्या निवडणुकीत कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा सव्वा लाखांच्या मताधिक्यांनी पराभव केला होता. यंदा मुरबाड येथील प्रचार सभेत ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी या निवडणुकीतसुद्धा कथोरे एक लाखाहून अधिक मताधिक्याने विजय प्राप्त करतील आणि त्यांना सत्तेत मंत्रिपद मिळेल, अशी घोषणा केली होती, मात्र या अंतर्गत वादाचा फटका कथोरे यांना मिळणाऱ्या मतांवर पडल्यामुळे यंदा मताधिक्य कमी झाल्यामुळे यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार का, यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com