

जळगावातील वकील दाम्पत्याच्या घरात चोरी
मोलकरणीस अटक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : शहरातील शिवाजीनगरात राहत्या घरात कोणी नसल्याची संधी साधत २६ हजार रुपये चोरताना सोनी हनुमान पवार (वय २४, रा. शिवशक्तीनगर, जळगाव) या मोलकरणीला घरमालक महिलेने रंगेहाथ पकडले. ही घटना काल शनिवारी (ता. २३) सकाळी नऊला घडली. याप्रकरणी मोलकरणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरात ॲड. अंजली भुसारी कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. शनिवारी सकाळी नऊला त्यांचे पती ॲड. केदार भुसारी हे मालेगाव येथे गेले होते. त्यावेळी ॲड. अंजली व त्यांच्याकडे घरकाम करणारी सोनी पवार या घरी होत्या. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या ॲड. अंजली घरात परत आल्या असता, मोलकरणीने कपाटातून २६ हजार रुपये काढून व कपाट पुन्हा लावत असल्याचे दिसले. तिला रंगेहाथ पकडून शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलिस तेथे पोहोचले व मोलकरणीला ताब्यात घेतले. चोरीच्या या घटनेच्या एक दिवस अगोदरच ॲड. केदार भुसारी यांनी पत्नीकडे ५७ हजार रुपये दिले होते. चोरी करताना मोलकरणीने संशय येऊ नये, म्हणून त्यातून केवळ २६ हजार रुपयेच काढले व उर्वरित रक्कम कपाटातच राहू दिली; मात्र त्याचवेळी ती रंगेहाथ पकडली गेली. याप्रकरणी ॲड. अंजली भुसारी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनी पवारविरुद्ध गुन्हा दाखल करीत तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक सतीश पाटील करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.