उत्‍पादन घटल्‍याने शेकडो मासेमारी बोटी किनारी उत्‍पादन घटल्‍याने शेकडो मासेमारी बोटी किनारी

उत्‍पादन घटल्‍याने शेकडो मासेमारी बोटी किनारी
उत्‍पादन घटल्‍याने शेकडो मासेमारी बोटी किनारी
Published on

श्रीवर्धन, ता. १८ (वार्ताहर)ः बदलते हवामान, वादळी वारे, अवकाळी पावसामुळे मत्‍स्य उत्‍पादनात मोठी घट झाली आहे. कामगारांचे पगार, रसद खोल समुद्रात जाण्यासाठी होणारा डिझेल खर्चही निघत नसल्‍याने काही दिवसांपासून शेकडो बोटी तालुक्‍यातील बंदरांमध्ये नांगरून आहेत, तर काही मच्छीमार अन्य व्यवसाय करण्याच्या विचारात आहेत.
श्रीवर्धन येथे जीवना बंदर, मूळगाव कोळीवाडा तर तालुक्यात दिघी, कुडगाव, आदगाव, दिवेआगर, भरडखोल, बागमांडला या गावांतून जवळपास साडेसहा हजार मच्छीमार व्यावसायिक आहेत. मासेमारी हा १० महिन्यांचा व्यवसाय असून, या कालावधीत जे आर्थिक उत्पन्न मिळेल, त्या उत्पन्नांवर मासेमारी बंदी काळातील दोन महिन्यांचे आर्थिक नियोजन करावे लागते. या वर्षीच्या मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आहे, परंतु मासेमारी होड्या समुद्रात गेल्यावर वादळी वारा, लहरी वातावरणामुळे अनेकदा मच्छीमारांना रिकाम्‍या हाती बंदरात परतावे लागते.
मासळी उत्‍पादनात घट झाली असून, प्रत्‍येक फेरीसाठी एका बोटीमागे ४० ते ५० हजारांचा खर्च येतो. यात डिझेल, बर्फ, भत्ता, खलाशांचे पगार व बोटींची देखभाल आदींचा समावेश असतो. त्यातच बोटींचा संख्या वाढली असून, अनेकांनी व्यवसायवाढीसाठी कर्ज घेतले आहे. त्‍या तुलनेत मासळी मिळत नसल्‍याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे.

१२ महिन्यांतील काही महिने वातावरण खराब, हवामान खात्याने दिलेले इशाऱ्यामुळे मासेमारी बंद होती. त्‍यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. बोटीवरचे खलाशी, कामगारांवरही बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. व्यवसायवाढीसाठी घेतलेले बॅंकांचे कर्ज, डिझेल परताव्याचे प्रश्न आहेत. त्‍यामुळे सरकारने सहानुभूतीने विचार करणे अपेक्षित आहे.
- हरिदास वाघे, संचालक, श्रीकृष्ण मच्छीमार सोसायटी, जीवना बंदर

जीवना बंदरात बोटींची दुरुस्‍ती
जीवना बंदर येथे बोटी नांगरून ठेवल्या असून, बोटींची दुरुस्ती सुरू आहे. मच्छीमार व्यावसायिकांची बंदरावर रापण छिलण्याची कामे सुरू आहेत. २५ ते ३० पेरा (जाळी) एकत्रित करून रापण छिलणे (दोन जाळी एकत्रित करून तंगुसाने शिवणे) या कामात मच्छीमार सध्या गुंतले आहेत. सध्या ६२३ मोठ्याव ३५८ लहान बोटी बंदरात नांगरून असून, वर्षभर मासळी हंगाम मंदीत गेल्‍याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com