जंजिरे धारावी जतन समितीचा गौरव

जंजिरे धारावी जतन समितीचा गौरव
Published on

जंजिरे धारावी जतन समितीचा गौरव
किल्ला संवर्धनाच्या प्रयत्नामुळे गडपती पुरस्कार
भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : उत्तनजवळील चौक गावात असलेल्या जंजिरे धारावी किल्ल्याच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचा विशेष गौरव करण्यात आला. ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त ‘गडपती’ या विशेष कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कर्तृत्ववान ३० संस्थांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मिरा-भाईंदर शहरातील आपल्या जंजिरे धारावी किल्ला जतन समिती संस्थेची निवड करण्यात आली होती.
नरवीर चिमाजी आप्पांच्या वसई किल्ल्यावरील विजयाचा साक्षीदार असलेल्या जंजिरे धारावी किल्ल्याचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी ही जतन समिती गेल्या आठ-नऊ वर्षांपासून प्रयत्न करत आहे.
-----------------------
समितीच्या प्रयत्नांना यश
किल्ल्याचे संवर्धन व्हावे, त्याची सुरक्षा राखण्यात यावी, यासाठी त्यांनी आंदोलने, महापालिका व राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश येऊन अखेर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाला मान्यता मिळाली आहे.
----------------------------
या कामाची नोंद घेऊन समितीला गडपती सन्मानचिन्ह तसेच ११ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, गजानन काळे, संदीप पाचंगे या सोहळ्याला उपस्थितीत होते. जंजिरे धारावी जतन समितीचे उपाध्यक्ष निखिल एकनाथ पाटील, साक्षी गुरव, राकेश कदम यांनी हा सन्मान स्वीकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com