सिडकोच्या मुजोरपणामुळे ‘स्वप्नपूर्ती’चे रहिवांशी हैराण

सिडकोच्या मुजोरपणामुळे ‘स्वप्नपूर्ती’चे रहिवांशी हैराण
Published on

सिडकोच्या मुजोरपणामुळे ‘स्वप्नपूर्ती’चे रहिवासी हैराण
अंबादास दानवे यांचा अधिनेशनात संताप

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : खारघर येथील स्वप्नपूर्ती सोसायटीला अव्वाच्या सव्वा देखभाल-दुरुस्तीचे शुल्क पाठवल्यानंतर सिडकोने अचानक लिफ्ट, पाणी आणि सुरक्षा रक्षक काढून घेतले. सिडकोच्या या तुघलकी कारभारावर मंगळवारी (ता. १८) विधिमंडळाच्या अधिवेशनात जोरदार पडसाद उमटले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाची सिडकोचे अधिकारी पायमल्ली करीत असल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिडकोच्या मुजोर अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. सिडकोने उभारलेल्या स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये सुमारे साडेचार हजार घरे आहेत. या घरांमध्ये आजमितीस १० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव्याला आहे. मागील आठवड्यामध्ये सिडकोने अचानक येथील घरमालकांना सुमारे दोन लाख रुपयापर्यंतचे देखभाल-दुरुस्तीचे शुल्क भरण्याच्या नोटिसा बजावल्या. या नोटिसांमुळे रहिवासी चक्रावून गेले. याबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिंदे यांनी सिडकोला देखभाल-दुरुस्तीच्या देयकाबाबत तोडगा निघेपर्यंत सुविधा सुरू ठेवण्याचे आदेश सिडकोला बजावले होते; तरीही सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून सोसायटीचे सुरक्षा रक्षक, लिफ्ट आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे काम केले. याबाबत येथील नागरिकांनी दानवे यांची भेट घेत घडलेली परिस्थिती सांगितली. याबाबत दानवे यांनी सभागृहात हा विषय मांडून मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही सिडकोचे अधिकारी ऐकत नसल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत संताप व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com