बेलापूर रेल्वेप्रवाशांना मिळणार खड्डेमुक्त रस्ता

बेलापूर रेल्वेप्रवाशांना मिळणार खड्डेमुक्त रस्ता
Published on

वाशी, ता. २० (वार्ताहर) : बेलापूर रेल्वे स्थानक आणि अर्बन हटच्या दरम्यान असणाऱ्या सेवा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करून सिडकोने रेल्वे प्रवाशांना दिलासा द्यावा, याबाबतची आग्रही मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने सिडको प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत अखेर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची वर्क ऑर्डर निघाली आहे. लवकरच रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे सिडको प्रशासनाने सांगितले.
रेल्वे ट्रॅक ओलांडून होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूंना ग्रील लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यामुळे आग्रोळी, आयकर कॉलनी व सेक्टर ३०, बेलापूर येथील रेल्वे प्रवाशांना वर्षानुवर्षे दुरवस्थेत असणाऱ्या रस्त्याचा वापर करून रेल्वे तिकीट खिडकीकडे व प्लॅटफॉर्मकडे जाण्याचा एकमेव मार्ग उरलेला आहे. हा रस्ता सिडकोचा की पालिकेचा, या वादात या रस्त्यावर खाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने एक वेळेस तातडीने साफसफाई केली; परंतु पुन्हा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. ठिकठिकाणी कचरा-डेब्रिज टाकलेला आहे. रेल्वे स्थानक इमारतीच्या बाहेरील पाइपमधून स्वच्छतागृहाचे पाणी रस्त्यावर पसरून दुर्गंधी पसरलेली आहे. आता रस्ता नव्याने निर्माण केला जात असल्याने प्रवाशांची दुर्गंधी आणि खड्डेयुक्त रस्त्यातून सुटका होणार असल्याने सजग नागरिक मंचचे सदस्य अनिल पवार यांनी समाधान व्यक्त केले आहे.
--------
अर्बन हटची भिंत धोकादायक
रस्त्याच्या बाजूला अर्बन हटची भिंत असून, या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले असल्याने पावसाळ्यात दगड, माती रस्त्यावर येत असते. मोठ्या पावसात ही भिंत कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत सिडकोने रस्त्याचे डांबरीकरण करण्यापूर्वी रेल्वे प्रवाशांना धोकादायक ठरणाऱ्या भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी भीमराव जामखंडीकर यांनी केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com