लाईव्ह न्यूज

कल्याण पश्चिमेकडे ‘रिक्षा कोंडी’

कल्याण पश्चिमेकडे ‘रिक्षा कोंडी’
Published on: 

कल्याण पश्चिमेकडे ‘रिक्षा कोंडी’
कल्याण, ता. २६ (बातमीदार) ः एकीकडे महापालिकेच्या सॅटिसचे काम आणि दुसरीकडे शेकडोने होणाऱ्या रिक्षांच्या वाहतुकीमुळे इतर कोणत्याही वाहनाला रेल्वेस्थानक परिसरात प्रवेश करणे अवघड झाले आहे. या रिक्षा कोंडीकडे वाहतूक पोलिसांसह महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांसह नागरिकांकडून होत आहे.

कल्याण-डोंबिवली पश्चिमेचा परिसर हा कायमच अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. रेल्वे, बसस्थानक, रिक्षा थांबे यामुळे इथे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होते. तसेच, अनेक सरकारी, खासगी कार्यालये, बाजारपेठ ही पश्चिमेलाच असल्याने खरेदीदार, नोकरदार मंडळींचीही मोठी वर्दळ असते. आता यात वाढलेल्या रिक्षाचालकांची भर पडलेली आहे.

कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील रिक्षा स्टँडसह रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानकातून बाहेर पडल्यावर गुरुदेव हॉटेलच्या दिशेने जाणारा रस्ता आणि दीपक हॉटेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर रिक्षाच उभ्या असतात. यामुळे येथून मार्ग काढताना प्रवाशांसह इतर वाहनचालकांची कोंडी होते. भिवंडी, खडकपाडा, कोळसेवाडी, बिर्ला कॉलेज रोड या भागात जाणाऱ्या या रिक्षा असतात. विशेषतः भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा या मुख्य रस्त्यांवरच उभ्या असतात. परिणामी, रेल्वेस्थानक परिसरात इतर खासगी वाहने प्रवेश करण्यासाठी धजावत नाहीत. दरम्यान, याबद्दल वाहतूक पोलिस आणि रिक्षाचालक संघटनेला विचारणा केली असता ते एकमेकांकडे आणि महापालिकेच्या सॅटिस प्रकल्पाकडे बोट दाखवत आहेत.

महापालिकेकडूनही कानाडोळा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस प्रकल्पाचे काम सध्या ६५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच अजून बरेच काम शिल्लक आहे; मात्र या कामामुळे रस्त्याच्या एका बाजूच्या वाहतुकीवरच परिणाम झाला आहे. जोवर सॅटिसचे काम पूर्ण होत नाही, तोवर ही कोंडी कमी होण्याची चिन्हे नाहीत; मात्र या वाहतूक कोंडीकडे महापालिकेकडूनही कानाडोळा होत आहे.

कल्याणमध्ये ७५ हजार रिक्षा
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण आरटीओअंतर्गत तब्बल ७५ हजार रिक्षाचालकांनी परवाना मिळवला आहे. खुल्या परमीट व्यवस्थेमुळे अक्षरशः मागेल त्याला परवाना दिला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची संख्या आणि शहरातील उपलब्ध रस्ते आणि त्यांचे आकार यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे.

वाहतूक विभागाचे दुर्लक्ष
कल्याणमधील रिक्षा- टॅक्सीचालक- मालक असोसिएशनचे कार्याध्यक्ष संतोष नवले म्हणाले, की वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रिक्षा या रेल्वे व बसस्थानकातून मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना मार्गस्थ करतात. या वेळी वाहतूक विभागाने रस्त्यात वाहतुकीचे योग्य नियोजन करायला हवे. रिक्षाचालक त्याला साथ देतील.

आमचे वाहतूक अंमलदार या भागात दररोज उभे असतात. ते या वाहतुकीचे नियमन करतात. तसेच महापालिकेच्या सॅटिस प्रकल्पाचे काम सुरू आहे. आम्ही रेल्वेस्थानक परिसरात अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घातली आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली आहे; मात्र रिक्षांची संख्यादेखील मोठी आहे.
- राजेश शिरसाठ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक उपविभाग, कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com