

नवीन प्रतिभावंत कलाकारांसाठी ‘ओपन माइक’ कार्यक्रम
मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः येथील आरोग्यम, पॅराडाइज शॉपिंग येथे मुलुंडमधील आगामी प्रतिभावंत कलाकारांसाठी ‘ओपन माइक’ कार्यक्रमाचे आयोजन सोनम केवट यांनी केले होते. या कार्यक्रमात ५५ उदयोन्मुख कलाकारांनी गाणी, कविता, कथा, मिमिक्री, वाद्ये आणि वादन या कलांमध्ये आपले कौशल्य दाखवले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबुलाल सिंग, डॉ. आर. एम. पाल, कवी, साहित्यिक कलाकार दिलबाग सिंग, कराटे प्रशिक्षक दयाशंकर पाल, लेखक अरविंद बिंद, समता हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शरीफ खान उपस्थित होते. या वेळी बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगसाधक सोनम केवट म्हणाल्या, की आपल्यामध्ये अनेक प्रतिभावान व्यक्ती आहेत; मात्र योग्य संधी नसल्यामुळे ते दडपून राहतात. सर्वांना संधी उपलब्ध करून दिल्या तरच या कलाकारांचे कौशल्य जनतेसमोर आणता येईल. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देताना डॉ. बाबुलाल सिंग म्हणाले, की असे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित केले पाहिजेत. त्यांनी सर्व कलाकारांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.