

इमारतीचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू
भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : नागाव परिसरात असलेल्या अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील सदनिकेत छताचे प्लास्टर कोसळून सहा महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, १७ मार्च रोजी घडलेल्या या घटनेची कोठेही वाच्यता झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नागाव परिसरातील सागर हॉटेलसमोर असलेली अन्सारी अपार्टमेंट ही इमारत असगर अली मोहरम अली व हैदर अली मोहरम अली यांच्या मालकीची आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर शमीम अन्सारी हा कुटुंबीयांसह भाड्याने राहत होता. त्याठिकाणी पत्नी शमा परवीन शमीम अन्सारी व सहा महिन्याचा चिमुरडा शोएब हे घरात पलंगावर झोपले असताना अचानक छताच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळले. या घटनेत शमा परवीन व चिमुकला शोएब गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शोएबचा मृत्यू झाला तर शमा परवीन हिच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे भिवंडी शहरातील जुन्या, धोकादायक व अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात पालिका प्रशासन करीत असलेल्या हलगर्जीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेबाबत शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी या घटनेबाबत अपघाती मृत्यूची नोंद केली असून कोणाविरोधात तक्रार नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे, या घटनेची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला अथवा स्थानिक प्रभाग समिती कार्यालयाला नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.