आयपीएल क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

आयपीएल क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
Published on

‘वानखेडे’चा उत्तरेकडील पादचारी पूल सेवेत
आयपीएलच्या चाहत्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२५ स्पर्धेला शानदार सुरुवात झाली असून, यंदाही वानखेडे स्टेडियमवर अनेक रोमांचक सामने रंगणार आहेत. याच पार्श्वभूमीवर चर्चगेट स्थानकाजवळील वानखेडे स्टेडियमकडे जाणारा उत्तरेकडील पादचारी पूल शुक्रवारपासून (ता. २८) प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आणि क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे.
वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचे सामने पाहण्यासाठी हजारो चाहते येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानक आणि स्टेडियम दरम्यानच्या वाहतुकीला अधिक गती देण्यासाठी हा पूल मोठ्या सोयीचा ठरणार आहे. जून २०२० मध्ये आयआयटी मुंबईच्या सुरक्षा अहवालानंतर हा पूल बंद करण्यात आला होता; मात्र मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आर्थिक मदत केल्याने पश्चिम रेल्वेने अवघ्या आठ महिन्यांत पुनर्बांधणी पूर्ण केली. हा पूल आता दोन जिन्यांसह कार्यान्वित करण्यात आला आहे. एक जिना पूर्वेकडे (उत्तरमुखी) आणि दुसरा पश्चिमेकडे (उत्तरमुखी) आहे. यामुळे रेल्वेस्थानक आणि वानखेडे स्टेडियमदरम्यानचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. पुलाचे पूर्व आणि पश्चिम बाजूचे आणखी दोन (दक्षिणमुखी) जिने येत्या ७ एप्रिलपर्यंत पूर्ण होऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.
...
६.५० कोटींचा खर्च 
६.३० मीटर रुंद आणि ४८ मीटर लांब असलेल्या या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ६.५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रकाशयोजना आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com