३१ मार्चचा बँक हॉलिडे रद्द

३१ मार्चचा बँक हॉलिडे रद्द
Published on

३१ मार्चचा बँक हॉलिडे रद्द

मुंबई, ता. २८ : सरकारी व्यवहारांच्या देण्याघेण्याच्या सर्व नोंदी याच आर्थिक वर्षात नोंदवल्या जाव्यात यासाठी रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च रोजीचा बँक हॉलिडे रद्द केला असून ही कामे करणाऱ्या बँकांना खुले राहण्यास सांगितले आहे.
३१ मार्च रोजी रमजान ईदची रजा आहे; मात्र रिझर्व्ह बँकेने हा आदेश काढून ती सुट्टी रद्द केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील सरकारी देणी-घेणी त्याच वर्षात दिसावीत म्हणून रिझर्व्ह बँकेने ही काळजी घेतली आहे. अन्यथा त्यानंतर १ एप्रिल रोजीदेखील बँक हॉलिडे असल्यामुळे हे व्यवहार दोन तारखेनंतरच खात्यामध्ये दिसतात. ते टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. सरकारी कर म्हणजे आयकर, जीएसटी इ. पेन्शन आणि सरकारी अनुदाने, सरकारी वेतन आणि भत्ते तसेच सरकारी योजनांचे व्यवहार हे त्याच वर्षात दिसावेत, असा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com