मनसेच्या मेळाव्‍यामुळे दादर परिसर भगवामय

मनसेच्या मेळाव्‍यामुळे
दादर परिसर भगवामय
Published on

मनसेच्या मेळाव्‍यामुळे
दादर परिसर भगवामय

भरउन्हातही कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, ‘कोण आले रे कोण आले मनसेचे वाघ आले’ अशा गगनभेदी घोषणा देत ढोल-ताशांच्या तालावर नाचत रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारो कार्यकर्ते दुपारपासूनच शिवाजी पार्कवर दाखल होत होते. शिवाजी पार्कच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर दुतर्फा लागलेले भगवे झेंडे आणि होर्डिंग यामुळे हा परिसर अक्षरश: भगवामय झाला होता. निमित्त होते मनसेच्या शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या गुढीपाडवा मेळाव्याचे.

मनसेने गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थावर या, असे आवाहन केले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यभरातून हजारो मनसेचे कार्यकर्ते शिवाजी पार्कवरील मेळाव्याला दाखल झाले होते. रखरखीत उन्हातही कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. कार्यकर्त्यांच्या हातात ‘मी राज ठाकरेंचा निष्ठावान मनसैनिक’ असे फलक झळकत होते. या मेळाव्‍यानिमित्त दादर शिवाजी पार्कसह दादर परिसरात सर्वच रस्त्यांवर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती.

कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा
मुंबई महापालिकेसह राज्यभरात वेगवेगळ्या पालिकांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षभरात होणार आहेत. ‘या निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार; नको युती, नको आघाडी’ अशा घोषणाही कार्यकर्ते देत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com